भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्था, पुसद आपले स्वागत आहे.
दिवंगत भारती मैंद यांचे किडनी फेलीवरणे युवावस्थेत आकस्मित निधन झाले. स्व. भारती ची आठवण कायम स्मरणात राहावी या सद्हेतूने भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना संस्थापक, अध्यक्ष अॅड. श्री आप्पाराव मैंद यांनी दि.१८ / ०२ / २००२ रोजी महात्मा जोतीबा फुले समता मंदिर, आठवडी बाजार, पुसद येथे केली.
संस्थेला अध्यक्ष म्हणून लाभलेले अॅड. श्री आप्पाराव मैंद यांना बँकिंग क्षेत्राचा २८ वर्षाचा संचालक पदाचा अनुभव असून त्यापैकी १४ वर्षे पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी यशस्वी रित्या कार्य केले आहे. व्यवसायाने वकील असलेले अॅड. श्री आप्पाराव मैंद हे सामाजिक चळवळीशी समरस व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. सत्य शोधक समाज, महाराष्ट्र गृह रक्षक दल, वाचनालय, साप्ताहिक तथा स्मरणिका प्रकाशन इत्यादी भरीव कार्यासह डाॅ. पंजाबराव देशमुख यांचे जीवन चरित्र अॅड. श्री आप्पाराव मैंद यांनी शब्द बद्ध केले आहे.