www.bhartimaindpatsanstha.com  
फोन: ०७२३३ - २४५८७१
भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्था, पुसद
 
दिवंगत भारती मैंद यांचे किडनी फेलीवरणे युवावस्थेत आकस्मित निधन झाले. स्व. भारती ची आठवण कायम स्मरणात राहावी या सद्हेतूने भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना संस्थापक, अध्यक्ष अॅड. श्री आप्पाराव मैंद यांनी दि.१८ / ०२ / २००२ रोजी महात्मा जोतीबा फुले समता मंदिर, आठवडी बाजार, पुसद येथे केली.

संस्थेला अध्यक्ष म्हणून लाभलेले अॅड. श्री आप्पाराव मैंद यांना बँकिंग क्षेत्राचा २८ वर्षाचा संचालक पदाचा अनुभव असून त्यापैकी १४ वर्षे पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी यशस्वी रित्या कार्य केले आहे. व्यवसायाने वकील असलेले अॅड. श्री आप्पाराव मैंद हे सामाजिक चळवळीशी समरस व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. सत्य शोधक समाज, महाराष्ट्र गृह रक्षक दल, वाचनालय, साप्ताहिक तथा स्मरणिका प्रकाशन इत्यादी भरीव कार्यासह डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवन चरित्र अॅड. श्री आप्पाराव मैंद यांनी शब्द बद्ध केले आहे.

अशा बहु आयामी व्यक्तीमत्वाचे धनी अॅड. श्री आप्पाराव मैंद यांच्या नेतृत्वात भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या अद्यावत तंत्रंत्रज्ञानाने युक्त १२ शाखा यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. संस्थेचे कार्यक्षेत्र यवतमाळ, अमरावती, वाशीम, आकोला, बुलढाणा, या जिल्ह्यात (अमरावती महसुल विभाग ) आहे. नुकतेच ३१ मार्च २०१५ ला संस्थेने रु. १००.०० कोटी ठेवींचे उदिष्टे पूर्ण केले, हे यश म्हणजे संस्थेच्या नेतृत्वावर सभासदांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतिक होय. ज्या समाजाने संस्थेच्या प्रगतीकरता सहकार्य केले त्या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून भारती मैंद स्मृती प्रित्यर्थ वर्धापन दिनी विविध समाजोपयोगी उपक्रम दर वर्षी राबविले जातात. यात पूर पिडीताना, दुष्काळग्रस्तांना मदत, डोळे तपासणी शाश्त्राक्रिया, चष्मे वाटप, आरोग्य तपासणी असे विविध कार्य सातत्याने केले जाते. या कार्याची दखल विविध फेडरेशन - फोरम ने घेतली असून संस्थेला पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अॅड. श्री आप्पाराव मैंद हे अतिशय अभ्यासू दूरदृष्टी असलेले नेतृत्व संस्थेला लाभले. पारदर्शक व्यवहार, कुशल स्वच्छ प्रशासन या वैशिष्ट्यामुळे अल्पावधीत भारती मैंद सहकारी पतसंस्था हि वैदर्भीय जनतेच्या मनावर अधिराज्य करत आहे.

अशा बहु आयामी व्यक्तीमत्वाचे धनी अॅड. श्री आप्पाराव मैंद यांच्या नेतृत्वात भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या अद्यावत तंत्रंत्रज्ञानाने युक्त १२ शाखा यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. संस्थेचे कार्यक्षेत्र यवतमाळ, अमरावती, वाशीम, आकोला, बुलढाणा, या जिल्ह्यात (अमरावती महसुल विभाग ) आहे. नुकतेच ३१ मार्च २०१५ ला संस्थेने रु. १००.०० कोटी ठेवींचे उदिष्टे पूर्ण केले, हे यश म्हणजे संस्थेच्या नेतृत्वावर सभासदांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतिक होय.

ज्या समाजाने संस्थेच्या प्रगतीकरता सहकार्य केले त्या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून भारती मैंद स्मृती प्रित्यर्थ वर्धापन दिनी विविध समाजोपयोगी उपक्रम दर वर्षी राबविले जातात. यात पूर पिडीताना, दुष्काळग्रस्तांना मदत, डोळे तपासणी शाश्त्राक्रिया, चष्मे वाटप, आरोग्य तपासणी असे विविध कार्य सातत्याने केले जाते. या कार्याची दखल विविध फेडरेशन - फोरम ने घेतली असून संस्थेला पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

अॅड. श्री आप्पाराव मैंद हे अतिशय अभ्यासू दूरदृष्टी असलेले नेतृत्व संस्थेला लाभले. पारदर्शक व्यवहार, कुशल स्वच्छ प्रशासन या वैशिष्ट्यामुळे अल्पावधीत भारती मैंद सहकारी पतसंस्था हि वैदर्भीय जनतेच्या मनावर अधिराज्य करत आहे.
पतसंस्थेची आर्थिक स्थिती
 
सन 2012-13 सन 2013-14 सन 2014-15
सन 2012-13
खळेते भांडवल = 59,27,30,641.60
ठेवी = 50,34,08,173.52
कर्ज = 33,91,58, 760.26
गुंतवणूक = 22,54,53,674.00
स्वनिधी = 5,35,01,113.31
नफा = 1,15,75,025.01
लेखा परीक्षण वर्ग = ‘अ’
CR/AR
NET NPA = 0%
सन 2013-14
खळेते भांडवल = 79,05,44,785.01
ठेवी = 65,60,17,507.46
कर्ज = 42,00,31,457.75
गुंतवणूक = 32,19,00,440.01
स्वनिधी = 6,66,73,959.32
नफा = 1,60,20,000.00
लेखा परीक्षण वर्ग = ‘अ’
CR/AR
NET NPA = 0%
सन 2014-15
खळेते भांडवल = 118,06,39,527.98
ठेवी = 100,40,77,611.14
कर्ज = 54,73,20,902.99
गुंतवणूक = 46,22,65,298.01
स्वनिधी = 8,14,31,559.32
नफा = 2,06,10,000.00
लेखा परीक्षण वर्ग = ‘अ’
CR/AR
NET NPA = 0%
संस्थेची वैशिष्ठे
स्थापणे पासून ऑडिट वर्ग 'अ'.
संपूर्ण कामगाज संगणीकृत.
संस्थेच्या भागधारक सभासदांना १५% प्रमाणे लाभांश.
शहर शाखा पुसद येथे लॉकर सुविधा उपलब्ध.
सोने तारण, वखार पावती, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे व विमा पॉलीसीवर त्वरित कर्ज उपलब्ध.
डिमांड ड्राफ्ट सुविधा उपलब्ध.
सर्व सभासदांना रु. १ लाखाचा अपघाती विमा .
मुख्य शाखा, शहर शाखा, व श्रीरामपूर शाखा येथे वीज बिल स्वीकृती केंद्र.